Wednesday, January 22, 2025
HomeपरभणीMeghna Bordikar:परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांची नियुक्ती

Meghna Bordikar:परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांची नियुक्ती

महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर या जिंतूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत.त्यांनी दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवेत मोलाचे योगदान दिले आहे

सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शेतकरी कल्याण, महिला सशक्तीकरण, पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, विज्ञान व तंत्रज्ञान विकास आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दीपस्तंभ फाऊंडेशनने विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि वैद्यकीय उपक्रम राबवले आहेत

परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा आणि प्रगती होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments