Wednesday, January 22, 2025
HomeपरभणीSELU : सेलू येथे राज्यस्तरीय तालुकाध्यक्ष मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या...

SELU : सेलू येथे राज्यस्तरीय तालुकाध्यक्ष मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते

मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने सेलू SELU येथे राज्यस्तरीय तालुकाध्यक्ष पत्रकार संघ मेळावा व आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऊर्जामंत्री राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते 1 फेब्रुवारी 2025 रोजी सेलू येथील साई नाट्य मंदिरात होणार असल्याची माहिती सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांनी दिली.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 256 तालुक्यांतील पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सहभागी होणार आहेत. परभणी व सेलू येथील पत्रकारांनी प्रा. नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची सेलू येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले. मंत्री बोर्डीकर यांनी हे निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली व सेलू येथे हा कार्यक्रम होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, राजू हटेकर, जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास, सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, कांचन कोरडे, मोहसीन अहमद, डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष सतीश आकात, अशोक अंभोरे, संजय मुंडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments